आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नंदुरबार:कोंडाईबारी घाटात ओव्हरटेक करताना प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स 30 फूट खोल नदीत कोसळली, 5 जण ठार तर 35 गंभीर जखमी

नवापूर/नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विसरवाडीजवळील कोंडाईबारी घाटात मलकापूरहून सुरतकडे जाणारी शुभम ट्रॅव्हल्सची बस 30 फूट खोल नदीत कोसळून पाच प्रवासी ठार झाले, तर 35 जखमी झाले. धुळे-सुरत-नागपूर महामार्ग क्रमांक सहावर बुधवारी पहाटे ओव्हरटेक करताना हा अपघात झाला.

अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले
अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले

पहाटे दोन वाजून 10 मिनिटांनी विसरवाडी घाटात किंग ट्रॅव्हल्सच्या बसला ओव्हरटेक करताना चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे किंग ट्रॅव्हल्सचा एका बाजूचा पत्रा कापला जाऊन शुभम ट्रॅव्हल्स पुलावरून 30 फूट खोल असलेल्या नदीत जाऊन पडली. पहाटेची वेळ असल्याने प्रवासी गाढ झोपेत होते. त्यामुळे काही कळण्याच्या आतच हा भीषण अपघात झाला. जखमींवर नंदुरबार येथे उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली

मृत जळगाव, सुरतचे :

मृतांमध्ये प्रतिमा मुकेश मरोटी (३६, सुरत), अमर अशोक बारी (पाचोरा, जळगाव), शमसोद्दीन शेख युसूफ (४७, भुसावळ), शुभमचा चालक वर्दीचंद सोहनलाल मेघवाल (३५, सुरत), गणेश ऊर्फ पप्पू (३४, सहचालक, सुरत) यांचा समावेश आहे.