आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवापूरहून महाकाल मंदिरात जाणाऱ्या भाविकांची कार झाडाला धडकून झालेल्या अपघातात नवापूरसह गुजरातमधील भाविकांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी पांथपिपलाई ते रामवासाच्या दरम्यान घडली.
उज्जैन महाकाल मंदिरात दर्शनासाठी किरण हरीश पंड्या (वय २८, रा. रॉयल पार्क उच्छल, गुजरात) हा नवापूरहून रात्री कार (जी जे २६ एन ०३४९) चालवून जात होता. त्यांच्यासोबत कारमधून कमलेश मिठालाल खत्री (वय ३५, धनलक्ष्मी पार्क, नवापूर) आणि नितीन ठक्कर (वय ३९, सोनगड, गुजरात) होते. त्यांची कार मंगळवारी सकाळी पांथपिपलाई ते रामवासाच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला जाऊन झाडाला धडकली. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण भागातील अनेक लोक मदतीसाठी धावून आले आणि त्यांनी डायल १०० वर माहिती दिली.
त्यानंतर अपघाताची माहिती नानाखेडा पोलीस ठाण्यात देण्यात आली. तिघांनाही रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात पाठवले असता कमलेश खत्री आणि नितीन ठक्कर यांचा मृत्यू झाला तर किरण हे गंभीर जखमी झाले आहेत. डॉ. जितेंद्र शर्मा यांनी सांगितले की, सकाळी आलेल्या तीन लोकांपैकी दोन जण मृत अवस्थेत रुग्णालयात पोहोचले होते. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आले आहेत. बुधवारी दोघांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. मृतांच्या कुटुंबीयांना कळवले असून बुधवारपर्यंत उज्जैनला पोहोचतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.