आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नंदुरबार:नंदुरबार-रनाळे रस्त्यावर दोन वाहनांची समोरासमोर धडक; भीषण अपघात दोघांचा मृत्यू, तर दोन महिला जखमी

नवापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • याप्रकरणी पीकअप व्हॅन चालकाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

नंदुरबार-रनाळे रस्त्यावर दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींवर नंदुरबार जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. नंदूरबारकडून दोंडाईचाकडे जाणाऱ्या पिकअप वाहनाने पाचोराहून नवापूरकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. 

नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यातील पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नंदूरबार-रनाळा रस्त्यावरील कठोबा मंदिर जवळ शुक्रवारी सकाळी सव्वा सहाच्या दरम्यान अपघात झाला. या अपघातात गाडी क्रमांक एमएच 03 बीजे 2975 चा चालक याकूब गावित व सुलेमान गावित ठार झाले तर परिचारिका सोनिया कमलाकर गावित, पल्लवी गावित या दोघी जखमी झाल्या आहेत. अपघातात ठार झालेले युवक नवापूर तालुक्यातील नवापाडा येथील आहे.

  याप्रकरणी नंदूरबारची पीक अप व्हॅन क्रमांक एम एच 39 सी 9362 चा चालक रमाकांत प्रभाकर मराठे यांच्या विरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून दोघे मृतक युवकावर जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पुढील तपास नंदुरबार तालुका पोलिस करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...