आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारंगखेडा:भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीची समोरा-समोर धडक, तिघांचा मृत्यू

सारंगखेडा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तिघा मयतांचे सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले.

सारंगखेडा ते अनरद ( ता. शहादा ) गावादरम्यान रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष न देता भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी समोरा समोर धडकल्याने तिघा तरूणांचा मृत्यु झाल्याची घटना सायंकाळी घडली. सविस्तर वृत्त असे, अनरद येथील अक्षय रामा पाडवी (वय 33) हा बजाज सीटी 100 क्रं एम एच 18 - एयु 6906 दुचाकीने मोतीलाल मंगा भिल (वय 37) व सातबाई मोतीलाल भिल (दोन्ही रा. होळ ता. नंदुरबार) यांना घेऊन सारंगखेडाकडे जात होते तर दोंडाईचा कडून येणाऱ्या मनोज सैंदाणे (वय 26) रा. मुकटी ता. धुळे येथील तरूणाच्या पल्सर क्र. एमएच 18- बीएस 7515 ला दुचाकीने शहाद्याकडे येत होता. दोन्ही दुचाकी रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष न देता भरधाव वेगाने येत होता.

सारंगखेडा शिवारातील वाघेश्वरी पेट्रोल पंपाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक दिल्याने अक्षय पाडवी व मोतीलाल भिल यांचा जागीच मृत्यू झाला. सदरचा अपघात हा काळजाचा थरकाप उडवणारा होता. गंभीर जखमी असलेल्या मनोज सैंदाणेला म्हसावद येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना रस्त्यादरम्यान मृत्यू झाला. तर सताबाई भिल यांना डोक्याला व पोटाला दुखापत झाली आहे. सताबाई या त्यांच्या भावाची तब्येत पाहून पतीसह परत गावी जात होत्या. त्यांना तात्काळ नंदुरबार जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले.

तिघा मयतांचे सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सारंगखेडा पोलीस स्टेशनचे निरीक्षक राजेश शिरसाठ यांच्यासह हवालदार विजय गावित, शानाभाऊ ठाकरे घटनास्थळी पोहचले. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. शिरसाठ करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...