आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाडावर आदळली भाविकांची कार:उज्जैनला महाकाल मंदिराकडे जाणाऱ्या महाराष्ट्रातील वाहनाचा भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू, एक जण गंभीर

नवापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
कमलेश खत्री आणि नितिन ठक्कर असे आहे मृत व्यक्तींचे नाव - Divya Marathi
कमलेश खत्री आणि नितिन ठक्कर असे आहे मृत व्यक्तींचे नाव

गुजरातहून उज्जैनला महाकाल मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची कार आज भरधाव वेगात रस्त्यावरून झाडावर आदळली. या अपघातात दोन भाविक ठार, तर एक जण जखमी झाला. अपघात होताच ग्रामस्थांच्या मदतीने तिघांनाही जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. तेथे नवापूर येथील कमलेश खत्री आणि गुजरातमधील नितीन ठक्कर या दोन तरुणांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

उज्जैन महाकाल मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या गुजरात आणि महाराष्ट्रातील भाविकांची कार मंगळवारी सकाळी पांथपिपलाई ते रामवासाच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला जाऊन झाडाला धडकली. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण भागातील अनेक लोक मदतीसाठी धावून आले आणि त्यांनी डायल 100 वर माहिती दिली. त्यानंतर अपघाताची माहिती नानाखेडा पोलीस ठाण्यात देण्यात आली. तिघांनाही रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात पाठवले असता कारमधील 3 पैकी 2 जणांचा मृत्यू झाला. डॉ जितेंद्र शर्मा यांनी सांगितले की, सकाळी आलेल्या तीन लोकांपैकी दोन जण मृत अवस्थेत रुग्णालयात पोहोचले होते. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आले आहेत. बुधवारी दोघांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. दोन्ही मृतांच्या कुटुंबीयांना कळवण्यात आले असून बुधवारपर्यंत सर्वजण उज्जैनला पोहोचतील.

नानाखेडा पोलिसांनी सांगितले की, किरण हरीश हे कार चालवत होते. ते जखमी झाले आहेत. त्यांच्यासोबत कारमधून कमलेश मिठालाल खत्री (वय 35, धनलक्ष्मी पार्क, नवापूर) आणि नितीन ठक्कर (वय 34, सोनगड, गुजरात यांचा अपघातात मृत्यू झाला. कार नितीनची असून तिघेही महाकालच्या दर्शनासाठी उज्जैनला जात होते.

हे तिघेही रात्री उशिरा गुजरातहून महाकालच्या दर्शनासाठी निघाल्याचे नानाखेडा पोलिसांनी सांगितले. शक्यतो रात्रभर गाडी चालवल्यामुळे पहाटे झोपेची डुलकी आली असेल बसला आणि गाडी रस्त्याच्या कडेला येऊन झाडावर आदळली आणि उलटल्याने दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. तर किरण अजूनही जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल आहे. रात्रभराच्या प्रवासामुळे थकवा आल्याने कार चालवत असलेल्या किरणला झोप लागली असेल असा, अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. घटनास्थळी नवापूर मित्रपरिवार नातेवाईक निघाले आहे. कमलेश खत्रीचा अपघाती निधनाने नवापूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...