आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या आठ वर्षांपासून फरार असलेल्या एका आरोपीस नवापूर तालुक्यातील लक्कडकोट येथे जाऊन त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले असून तीन चारचाकी वाहनांसह ५ लाख ५५ हजार रुपये किमतीची अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर व नवापूर पोलिस ठाण्याचे पोनि ज्ञानेश्वर वारे व त्यांच्या पथकाने रुस्तम जमनादास गावित (वय ३५ रा. पिपलकुवा, ता. सोनगढ जि. तापी गुजरात ह. मु. लक्कडकोट ता. नवापूर) यांस ताब्यात घेतले. तसेच त्याच्या घराची तपासणी केली असता कंपाऊंडमध्ये उभ्या तीन चारचाकी वाहनामध्ये मुद्देमाल मिळून आला.
त्यात दोन लाख २५ हजार १२० रुपये किमतीचे देशी दारू सुगंधी संत्राचे एकूण ६७ खोके, एक लाख १४ हजार ८०० रुपये किमतीची दारू, ५३ हजार ७६० किमतीचे विदेशी दारूचे एकूण १४ खोके, ६७ हजार २०० रुपये किमतीची बिअर चे एकूण वीस खोके, ५९ हजार २८० रुपये किमतीची बिअर, २१ हजार ६०० रुपये किमतीची व्हिस्कीचे एकूण २ खोके, १३ हजार ९२० रुपये किमतीचे बिअरचे सात खोके असे एकूण ५ लाख ५५ हजार ६८० रुपयांची अवैध दारूसह २९ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच तीन चारचाकी व दुचाकी वाहने मिळून आली.
नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. रुस्तम गावित याचे मागे असलेल्या तसेच गुन्ह्यात सहभाग असणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.