आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंदुरबार एलसीबीच्या पथकाची कामगिरी:महिलेचे मंगळसूत्र चाेरणाऱ्या आरोपीस अटक; दोन लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून पसार झालेल्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. त्याच्याकडून २ लाख ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणातून अजून दोन गुन्हे उघड झाले.नंदुरबार शहरात १२ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास राजा चौक ते विमल हाउसिंग सोसायटी दरम्यान जयश्री चंपालाल चौधरी (वय ४७) या रस्त्याने पायी फिरत असताना एक अनोळखी मोटारसायकलवरील दोन इसमांनी त्यांच्या गळ्यात असलेले एक लाख २० हजार रुपये किमतीचे व ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरीने हिसकावून नेले होते.

एलसीबीच्या पथकाने घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासून अज्ञात आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला; परंतु चित्रण अस्पष्ट व दुचाकीला नंबर नसल्यामुळे आरोपींची ओळख पटली नाही. १७ रोजी मंगळसूत्राची चाेरी इंद्रीहट्टी, ता.जि. नंदुरबार येथील परशा व त्याच्या साथीदाराने मिळून केली असून ते दाेघे परशाच्या घरी आल्याची माहिती कळाली.

एलसीबीचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी तत्काळ त्यांचे एक पथक इंद्रीहट्टी येथे पाठवले. पथकाने इंद्रीहट्टीत हुशारीने त्यांच्या आजूबाजूला सापळा रचून परशा ऊर्फ परशराम चैत्राम भिल (वय २५) यांस ताब्यात घेतले. ही कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर व त्यांच्या पथकाने केली. त्यांच्या कामगिरीचे काैतुक हाेत आहे.

मंगळसूत्रासह तीन माेटारसायकली केल्या जप्त
त्यांनी जबरीने चोरलेले सोन्याचे मंगळसूत्र हे निजामपूर येथील सराफ व्यावसायिकाकडे गहाण ठेवले हाेते. त्याबाबत त्या व्यावसायिकास विचारपूस केली असता चार-पाच दिवसांपूर्वी परशराम भिल व त्याच्या सोबत एक अनोळखी इसम हे त्यांच्याकडे येवून त्यांना औषधोपचारासाठी पैशांची आवश्यकता असल्याचे खोटे सांगून अंदाजे ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र त्यांच्याकडे ७० हजारांत गहाण ठेवून गेल्याचे सांगितले. सराफ व्यावसायिकाने मंगळसूत्र पथकास परत दिले. मंगळसूत्र व एक लाख ६० हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी मिळून २ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

आराेपी बेन्टेक्सला भुलले, महिलेचे नुकसान टळले
दरम्यान आठ दिवसांपूर्वी दुपारच्या वेळी शहरातील डी मार्ट शॉपिंग मॉल समोरील रोडवर एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे पॉलिश असलेली बेन्टेक्सचे मंगळसूत्र जबरीने हिसकावले होते. परंतु ते सोन्याचे पॉलिश असलेले बेन्टेक्स धातूचे असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी ते फेकून दिले हाेते.

बातम्या आणखी आहेत...