आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहन‎ चालकांची तपासणी:मद्यप्राशन करून वाहन‎ चालवल्याने कारवाई‎

नंदुरबार‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दारू पिऊन मोटारसायकल‎ चालवण्याचे प्रमाण वाढले असून‎ दारू पिऊन मोटारसायकल‎ चालविणाऱ्यांमुळे अपघात होत‎ आहेत. पाेलिसांनी जिल्हा भरात‎ अॅनालायझर मिशनव्दारे वाहन‎ चालकांची तपासणी केली. यात ४०‎ जण मद्यप्राशन केलेले आढळून‎ आले. त्यामुळे या सर्व चाळीस‎ दुचाकी वाहन चालकांवर कारवाई‎ करण्यात आली आहे.‎ दुर्गमभागातील पिंपळखूटा, तळोदा,‎ धडगाव, चिखली फाटा,‎ सारंगखेडा, शहादा, डोंंगरगाव,‎ खांडबार, श्रावणी फाटा,‎ विसरवाडी, नवापूर शहर,‎ समशेरपूर फाटा, नंदुरबार‎ शहरातील जगताप वाडी,‎ करणचौफुली, बसस्थानक परिसर,‎ नेहरू पुतळा, गणेशनगर या भागात‎ ही कारवाई करण्यात आली.‎

बातम्या आणखी आहेत...