आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:अवैध दारूसाठाप्रकरणी कारवाई; 19 लाख 35 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत

नंदुरबार2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

होळी, धूलिवंदन व आगामी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा पोलिस दलाने धडक मोहीम राबवून गावठी हात भट्टीची दारू व देशी-विदेशी दारू बाळगणाऱ्यांकडून ५ दिवसांत १९ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यात गावठी हातभट्टीची दारू निर्मित करणारे देशी-विदेशी दारूची अवैध चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवून कारवाईच्या सूचना सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात ११ ते १६ मार्च दरम्यान नंदुरबार शहर पोलिस ठाणे येथे २, नंदुरबार तालुका पोलिस ठाणे (उपनगर पोलिस ठाणे ३, नवापूर पोलिस ठाणे ६. विसरवाडी पोलिस ठाणे-५. शहादा पोलिस ठाणे-९. धडगाव पोलिस ठाणे-२, सारंगखेडा पोलिस ठाणे-३, म्हसावद पोलिस ठाणे ३ अक्कलकुवा पोलिस ठाणे-५. तळोदा पोलिस ठाणे ३, मोलगी पोलिस ठाणे-२ असे एकूण४७ गुन्हे हातभट्टीची दारू निर्मित करणारे व देशी विदेशी दारूची चोरटी विक्री व वाहतुकीविरुद्ध गुन्हे दाखल केले.

बातम्या आणखी आहेत...