आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावन विभागाने धडगाव तालुक्यातील माकडकुंड भागातून १ लाख २५ हजार रुपये किमतीचे लाकडाचा जप्त केला आहे. यात साग व खैराचा समावेश आहे.अक्राणी वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांना अवैध लाकडाचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी छापा टाकला असता त्यांना माकडकुंड नियतक्षेत्रात नर्मदा नदीच्या लगत पौला गावाच्यापासून थोड्या अंतरावर अवैधरित्या विक्रीच्या उद्देशाने आणून ठेवलेल्या साग दांडी, साग बेलखे, खैर प्रजातीचे बेवारस लाकूड आढळले. वन विभागाच्या पथकाने तो ताब्यात घेतला.दि.वा.पगार, के.बी.भवर, एस.डी. साळुंके यांचा मार्गदर्शनाखाली सी. ए. काटे यांच्या नेतृत्वाखाली बी. एम. परदेशी, एन. डी. पवार, डी. एफ. पावरा, जी. बी. तडवी, आर. झेड. पावरा, ए. एस. पाडवी, एम. एम. वळवी, एच. टी. तडवी, बी. के. वसावे व बिलगाव वनक्षेत्रातील वनरक्षक एस. बी. भंडारी, एम. एच. तडवी, पी. एफ. पाडवी, व्ही. जी. पटले, यु. सी. पावरा, अनिल पावरा, जे. आर. पावरा, एम. एन. पावरा, पी. जे. पावरा, वनमजूर जेरमा पटले, बारदा पटले आदींनी ही कारवाई केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.