आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिक्रिया:अभिनेत्री रिंकूने साधला अवघा एक मिनिट संवाद

नंदुरबार23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मला या शोसाठी आमंत्रित करण्यात आले. छोट्याशा गावात देखील असे सुंदर कार्यक्रम आयोजित होऊ शकतात, हे पाहून मला खूप आनंद झाला. प्रत्येक मुलीला वाटते की आपण सुंदर दिसावे, काही तरी करावे. मला या कार्यक्रमात खूप मजा आली, अशी प्रतिक्रिया ‘सैराट फेम’ रिंकू राजगुरू या अभिनेत्रीने दिली. अवघे तीस सेकंद संवाद साधून रिंकूने नंदुरबार सोडले.

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित सौंदर्य स्पर्धेसाठी रिंकू राजगुरू अर्थात आर्चीने हजेरी लावली. कार्यक्रमाला शीतल चौधरी, सतीश चौधरी, तेजल चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. अभिनेत्री रिंकूने काही वेळ कार्यक्रम पाहिला. त्यानंतर विजेत्यांना बक्षिसे प्रदान केली. सैराट गीतावर नृत्य करण्याचे आवाहन सूत्रसंचालकाने केले. तेव्हा सर्व प्रेक्षक थिरकले. मात्र रिंकूने नृत्य केलेच नाही. तासभर उपस्थिती देत विजेत्या स्पर्धकांच्या डोक्यावर मुकुट चढवला. त्यानंतर तिने अवघा अर्धा मिनिट संवाद साधून लगेच सभागृह सोडले. अनेकांनी सेल्फी घेत मोबाइलमध्ये तिची छबी कैद केली. या कार्यक्रमास डॉ.रवींद्र चौधरी, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...