आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:सौंदर्य स्पर्धेला अभिनेत्री रिंकू राजगुरूची उपस्थिती

नंदुरबार25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लायन्स क्लबच्या वतीने मिस व मिसेस नंदुरबार सौंदर्य स्पर्धेसाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू या नंदुरबारला येणार असून, त्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक व डोक्यावर मुकुट दिले जाणार आहे, अशी माहिती आयोजक शीतल चौधरी यांनी पत्रकार परीषदेतून दिली.डॉ. तेजल चौधरी यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी डॉ. तेजल चौधरी,विनल चौधरी, सतीश चौधरी उपस्थित होते.

११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजेला स्पर्धेला सुरुवात होणार असून, या स्पर्धा तीन पातळीवर घेण्यात येणार आहेत. १६ ते ३० या गटातील अविवाहित मुलींसाठी मिस सौंदर्य, तर २१ ते ४० या विवाहित महिलांसाठी मिसेस नंदुरबार ही सौंदर्य स्पर्धा घेण्यात येणार आहे, अशी माहिती शीतल चौधरी यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात रात्री दहा वाजेला कार्यक्रमाचा समारोप होईल. विजेत्यांना रिंकू राजगुरू यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात येणार आहे. रिंकू राजगुरू यांच्या बद्दल तरूणांमध्ये आकर्षण आहे. म्हणून त्यांना अतिथी म्हणून नंदुरबारला आमंत्रित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...