आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:सफाई कामगारांच्या मागण्या मार्गी लावा

नंदुरबार5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांची दखल घेतली जावी आणि त्या सोडवण्याबाबत प्रशासकीय बैठक घेऊन शासकीय अधिकाऱ्यांना योग्य ते आदेश द्यावेत, अशी मागणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुंदन चिमन थनवार यांनी प्रशासनाकडे केली.जिल्ह्यातील नगर परिषदांत कार्यरत सफाई कामगारांच्या विविध मागण्या गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत.

याबाबत अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासन, मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनाही निवेदन दिलेे. नुकतेच निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना मागण्यांबाबत निवेदन दिले.

या आहेत मागण्या
सफाई कामगारांना ७ व्या वेतन आयोगाचा फरक तीन टप्प्यांत अदा करावा, १२ ते २४ वर्ष पूर्ण सेवा झालेल्या कामगारांना कालबद्ध व आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्यावा, स्वेच्छा निवृत्ती घेण्याबाबत अर्ज सादर केले असून महाराष्ट्र नागरी सेवा अध्यादेशानुसार स्वेच्छा निवृत्ती मंजूर व्हावी, २५ वर्ष सेवा किंवा सेवेत असताना मृत्यू झाल्यास सफाई कामगारांच्या पात्र वारसास मालकी तत्वावर मोफत सदनिका द्यावी आदी मागण्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...