आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:शाळेच्या दाखल्यावर मातृभाषेमध्ये आदिवासी असाच उल्लेख करावा; आमदार आमश्या पाडवींचे निवेदन

अक्कलकुवा16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रावर मातृभाषेचा उल्लेख करताना ‘आदिवासी भाषा’ असा उल्लेख करावा, अशी मागणी आमदार आमश्या पाडवी यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांच्या कडे केली आहे. नंदुरबारसह महाराष्ट्रातील सुमारे ११ आदिवासी बहुल जिल्हे तसेच उर्वरित महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या आदिवासी समाज बांधवांची मूळ मातृभाषा व बोली भाषा ही अहिराणी, पावरी, गोंडी आदी अशी आदिवासी भाषा आहे.

परंतु प्रार्थमिक शाळेत दाखल करताना मातृभाषा किंवा बोली भाषा ही ‘मराठी’ असल्याचे संबंधित शिक्षकांकडून नमूद केले जाते. ही एक गंभीर बाब आहे. त्यामुळे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र देताना मातृभाषा अथवा बोली भाषा नमूद करतांना ‘आदिवासी भाषा’ किंवा मूळ भाषा जसे की अहिराणी, पावरी, गोंडी आदी प्रत्यक्ष जी असेल ती नमूद करण्याची कार्यपद्धती अस्तित्वात आणावी, अशी मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...