आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगकाम:उच्च दाब वीज वाहिनीचा शॉक लागून प्रौढाचा मृत्यू ; दुसऱ्या माळ्यावर रंगकाम करताना घडली घटना

शहादाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पंचशील कॉलनीत घराच्या दुसऱ्या माळ्यावर रंगकाम करताना उच्च दाबाच्या वीज वाहिनीकडे ओढला गेल्याने शॉक लागून खाली पडल्यामुळे एकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी घडली. संजय दुल्लभ सामुद्रे (वय ४९), रा. प्रकाशा, ता. शहादा असे मृताचे नाव ऑहे. संजय सामुद्रे येथील नानाभाऊ आखाडे यांच्या घराच्या दुसऱ्या माळ्यावर दोन मजुरासोबत रंगकाम करत होते. सव्वादहा वाजेच्या सुमारास वरच्या माळ्याच्या बाहेरील बाजूस रंगकाम करताना घराजवळून गेलेल्या उच्च दाब वीज वाहिनीमुळे ते वीज प्रवाहाकडे ओढले गेले ऑणि शॉक लागून खाली पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात ऑई, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार ऑहे.

बातम्या आणखी आहेत...