आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तणावाचे वातावरण:खुनाच्या घटनेनंतर‎ निवळला तणाव‎

नंदुरबार‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील बाेहरी मशिदीजवळ‎ लागून असलेल्या रस्त्यावर‎ शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या‎ सुमारास जयेश दयाराम गंगावणे‎ याने अरबाज या युवकाचा खून‎ केल्यानंतर जयेश स्वत:हून पोलिस‎ ठाण्यात हजर झाला. तसेच‎ परिस्थितीचे गांभीर्य ओळखून‎ पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील हे‎ स्वत: घटनास्थळी पोहाेचल्याने‎ पुढील अनर्थ टळला.‎ रात्री उशीरापर्यंत पोलिस बंदोबस्त‎ तैनात होता. तसेच या घटनेनंतर‎ सामाजिक सलोखा राखण्यात‎ तसेच सर्वत्र शांतता प्रस्थापित‎ करण्यात पोलिस विभागाला यश‎ मिळाले. या प्रकरणाला आंतरधर्मीय‎ प्रेमविवाहाची किनार असल्याची‎ माहिती पाेलिसांनी दिली.

घटनेच्या‎ नंतर रात्री उशीरापर्यंत परिसरात‎ तणावाचे वातावरण हाेते.‎ परिसरातील अनेक व्यापाऱ्यांनी‎ दुकानेही बंद केली. त्यामुळे पोलिस‎ अधीक्षक पाटील यांनी हे प्रकरण‎ अत्यंत संवेदनशीलपणे हाताळले.‎ त्यामुळे शहरातील सर्व व्यवहार‎ पूर्ववत सुरळीत सुरू झाले आहेत.‎ त्यामुळे पाेलिसांसह नागरिकांनी‎ सुटकेचा निश्वास साेडला. पाेलिस‎ कर्मचारी स्थितीवर बारीक लक्ष‎ ठेवून आहेत. आवश्यक बंदाेबस्त‎ मात्र अद्याप कायम आहे.‎

बातम्या आणखी आहेत...