आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मनसे प्रमुखांकडून सांत्वन:कट्टर मनसैनिकाच्या आत्महत्येनंतर राज ठाकरेंचा कुटुंबियांना फोन, 'साहेब तुमचा वाघ गेला' म्हणत भावाच्या अश्रूंचा फुटला बांध, संभाषण होतेय व्हायरल

नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • माझा सहकारी कोलमडून पडतो तेव्हा मात्र मन अस्वस्थतेने घेरुन जातं - राज ठाकरे

नांदेड जिल्ह्यातील किनवट येथी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सुनील ईरावर यांनी आत्महत्या केली. यानंतर खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरेही अस्वस्थ झाले. राज ठाकरे यांनी सुनील ईरावर याच्या कुटुंबियांशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी सुनिल यांचे भाऊ अनिल यांच्याशी राज ठाकरेंनी संवाद साधला. यावेळी साहेब तुमचा वाघ गेला म्हणत अनिल यांनी हंबरडा फोडला.

सुनिलच्या जाण्यामुळे मनसेवर शोककळा पसरली आहे. यानंतर राज ठाकरे यांनी जेव्हा सुनिलच्या कुटुंबीयांचा सांत्वन करण्यासाठी फोन केला. यावेळी कुटुंबियांचा आक्रोश पाहून राज ठाकरेही स्तब्ध झाल्यायेच पाहायला मिळाले. राज ठाकरेंचे नाव ऐकताच सुनिल यांचा भाऊ अनिल यांनी साहेब तुमचा वाघ गेला म्हणत त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. तो तुमच्यावर खूप प्रेम करायचा. तुमच्याविषयी कुणीही बोलले तरी त्याला तो भांडण करायचा म्हणत अनिल यांनी हंबरडा फोडला. हे ऐकून राज ठाकरेही स्तब्ध झाले.

यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी सुनील यांचे भाऊ अनिल ईरावर यांचे सांत्वन करत काही दिवसानंतर मी स्वत: तुमची भेट घ्यायला येईन, काळजी घ्या, असे आपुलकीने सांगितले.

सुसाईड नोटमध्ये लिहिले होता राज ठाकरेंचा उल्लेख
सुनिल ईरावर यांनी गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये राज ठाकरेंचाही उल्लेख होता. 'राजसाहेब मला माफ करा. आमच्याकडे पैसा आणि जात या गोष्टीवर राजकारण केलं जातं. मात्र माझ्याकडे या दोन्ही गोष्टी नाहीत. जय महाराष्ट्र, जय राजसाहेब, जय मनसे’ असं म्हटलं होतं.

मनसेचं कार्यकर्त्यांना आवाहान
'अरे बाबांनो, जात आणि पैश्यात अडकलेलं राजकारण तर आपल्याला बदलायचं आहे पण माझा सहकारी कोलमडून पडतो तेव्हा मात्र मन अस्वस्थतेने घेरुन जातं..' असे भावनिक आवाहन राज ठाकरे यांनी मनसैनिक सुनील ईरावर यांच्या आत्महत्येनंतर केलं.

0