आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्हाडा योजनेनुसार घरकुल बांधून देण्यात यावे:म्हाडा योजनेंतर्गत घरकुलासह विविध मागण्यांसाठी आंदोलन

नंदुरबार3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

म्हाडा योजना अंतर्गत गरीब कुटुबांना शासन योजनानुसार मोफत घरकुल बांधून द्यावेत यासह विविध मागण्यांसाठी बेघर संघर्ष समितीकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले.शहरात अतिक्रमण करून २० ते २५ वर्षांपासून नवापूर साक्री चौफुली परिसर, गोसावी टेकडी परिसर, इमाम बादशाह टेकडी परिसर, खोडाई माता वैदू टेकडी परिसर, वाघेश्वरी माता टेकडी परिसर या जागेवर वास्तव्य करून रहात आहे.

या जागेचा सर्वे करून झोपडपट्टीच्या जागेवरच म्हाडा योजनेनुसार घरकुल बांधून देण्यात यावे. तसेच नंदुरबारातील पोलिस शासकीय सेवेत अनेक वर्षांपासून नोकरीत आहेत. काही पोलिसांना तुटके फुटके घरे दिली आहेत. हे घरे जास्त दिवसाचे झाल्यामुळे पावसाळ्यात गळते झाले आहेत. यामुळे पोलिस शासकीय नोकरीत असताना स्वत:चा निवारा बांधू शकले नाहीत असे पोलिसांना शासन योजनेत समाविष्ट करून शासन योजनेतून मोफत पोलिस कॉलनी नवीन बांधण्यात यावी, अशी मागणी बेघर संघर्ष समितीने केली आहे.

बातम्या आणखी आहेत...