आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी तळोद्यात किसान सभेचे आंदोलन

तळोदा5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात सरासरीपेक्षा सर्वाधिक पाऊस झाला असून नंदुरबार जिल्ह्यात देखील यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच परतीच्या पावसाने देखील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून राज्य सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा यासह विविध १५ मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने धरणे आंदोलन करीत राज्य सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.

तळोदा येथील प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ महाराष्ट्र राज्य किसान सभा नंदुरबारच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्याच्या शेतमजूर, निराधार महिला-पुरुष, आदिवासी, दलित, महिला, भटके-विमुक्तांचे विविध प्रश्न, विविध मागण्या सोडवण्यासाठी आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी किसान सभेच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. धरणे आंदोलन हे दिनांक २४, २५, व २६ नोव्हेंबर असे तीन दिवस चालणार आहे.

या आंदोलनात माकपचे जिल्हा सचिव व महाराष्ट्र राज्य किसान सभा नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष श्यामसिंग पाडवी, माकप जिल्हा कमिटी सदस्य अनिल ठाकरे, सुभाष पवार, जयसिंग माळी, पंचायत समितीचे माजी सदस्य तपिबाई माळी, मंगलसिंग चव्हाण, जिप माजी सदस्या इंदिराबाई चव्हाण आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...