आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोंदणीत नंदुरबार देशात ठरला पहिलाच जिल्हा:डिजिटल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उत्पादकांना आणण्यासाठी करार

नंदुरबार4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हाधिकारी कार्यालय, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग व नाबार्डच्या सहकार्यातून जिल्ह्यातील स्थानिक बचतगट, शेतकरी गट, उत्पादक कंपन्यामार्फत तयार करण्यात आलेल्या नावीन्यपूर्ण वस्तू व मालाची विक्री केंद्र शासनाच्या ओएनडीसीच्या डिजिटल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर करता यावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कौशल्य विकास व उद्योजकता विभाग आणि प्रोटीन टेक्नोलॉजी, मुंबई यांच्या समवेत शुक्रवारी सामंजस्य करार करण्यात आला. या डिजिटल प्लॅटफॉर्म वर समर्पित ई-स्टोर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून नोंदणी करणारा देशातील पहिलाच जिल्हा ठरला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावड़े, सहायक जिल्हाधिकारी पुलकित सिंह, मंदार पत्की, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक प्रमोद पाटील, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त विजय रिसे, ओएनडीसीचे प्रोटीन टेक्नॉलॉजीचे व्हाईस प्रेसिडेंट अंकुश देशपांडे, रॉबिन पांडे आदी उपस्थित होते. ओएनडीसीचे प्रोटीन टेक्नॉलॉजीचे अंकुश देशपांडे आणि रॉबिन पांडे यांनी ओएनडीसी या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर आणि या प्रोजेक्ट अंतर्गत विकसित केलेल्या “नंदुरबार ई-मार्केट प्लेस” च्या वापरा संदर्भात सादरीकरण केले. पहिल्या फेरीत ५ विक्रेत्यांची या प्लॅटफॉर्मवर यशस्वीपणे नोंदणी करण्यात आली. आगामी काळात प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ३०० उत्पादकांची नोंदणी प्रोटीन टेक्नॉलॉजीमार्फत नंदुरबार ई-स्टोरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...