आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंदुरबार:जिल्ह्यात 25 जूनपासून कृषी संजीवनी मोहीम

मोहीम3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्ह्यात २५ जून ते १ जुलै या कालावधीत कृषी संजीवनी मोहीम राबवली जाणार असून, अधिकाधिक शेतकऱ्यांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर यांनी केले आहे.

२५ जून रोजी विविध पिकांचे तंत्रज्ञान प्रसार व मूल्य साखळी बळकटीकरण दिन, २६ रोजी पौष्टिक तृणधान्य दिन, २७ रोजी महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण दिन, २८ रोजी खत बचत दिन, २९ रोजी प्रगतिशील शेतकरी संवाद दिन, ३० रोजी शेतीपूरक व्यवसाय दिन व १ जुलै रोजी कृषी दिन साजरा करण्यात येणार असून, त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

कृषी संबंधित संस्थांतर्फे कार्यक्रमांचे आयोजन
मोहिमेत कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, पशुसंवर्धन दुग्धविकास विभाग, मत्स्यविभाग, खादी ग्रामोद्योग विभाग व स्वयंसाहायत्ता संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे कृषी विभागाने कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...