आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातापी नदीचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात वळवून परिसरातील शेती १०० टक्के सिंचनाखाली येण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करत असल्याची ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली.नंदुबार तालुक्यातील खोंडामळी येथे जलजीवन मिशन अंतर्गत ९ गावांच्या पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन करण्यात आले.
या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील, पंचायत समिती सदस्य प्रकाश गावित, मंगलसिंग भील, सरपंच शोभाताई पाटील (भालेर), रोहिणी पाटील (खोंडामळी),भागाबाई कोटवाय (धामडोद), सीताबाई भील (भागसरी), अधिकारी, पदाधिकारी व पंचक्रोशीतील खोंडामळी, धामडोद, बामडोद, शिंदगव्हाण, विखरण, जुनमोहिदा, भालेर, भागसरी, कलमाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रतिव्यक्ती पाण्याचे नियोजन करून येणाऱ्या ३० वर्षांना पुरेल एवढे पेयजल उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या पाणीपुरवठा योजनेचे वीज बिल १०० टक्के शासन भरणार असल्याने विद्युतपुरवठ्या अभावी योजना थांबणार नाही, अशी ही शाश्वत स्वरूपाची जलयोजना असल्याचेही यावेळी यावेळी सांगून लवकरच पक्क्या रस्त्यांच्या निर्मितीतून, गटारींच्या बांधकामातून गावातील वाड्या-वस्त्या चकाकणार असल्याचीही ग्वाही यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी दिली. तसेच या वळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित खासदार हीना गावित यांनीही मार्गदर्शन केले.
या गावांच्या पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन
यावेळी खोंडामळी, धामडोद, बामडोद, शिंदगव्हाण, विखरण, जुनमोहिदा, भालेर, भागसरी, कलमाडी या गावांच्या पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन करण्यात आले.
जिल्ह्यात आरोग्य सेवांचे करणार बळकटीकरण
जिल्ह्यातील प्रत्येकाला आरोग्य सुविधा मिळण्यासाठी आरोग्य सेवांचे बळकटीकरण केले जाणार असून मोठ्या गावांमध्ये आरोग्याची प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र उभारून आवश्यकतेनुसार तेथे सेवा वाढवल्या जातील. आवश्यक तेथे अंगणवाड्या उभारून शाळेच्या खोल्या, विद्युतीकरण करणार असल्याचेही डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.