आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:3 दिवसांनी अक्कलकुवा पूर्वपदावर; चार चाकी वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान

अक्कलकुवा19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हॉट्सअॅप स्टेट्स ठेवण्याच्या वादातून अक्कलकुवा शहरात दि.१० जून रोजी मध्यरात्रीनंतर तुफान दगडफेक करून दुचाकीसह,चार चाकी वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान केले होते.

याचा निषेध म्हणून दि.११ जूनपासून अक्कलकुवा शहर स्वयंस्फूर्तीने तीन दिवस बंद ठेवले. घटनेतील मुख्य आरोपींवर कारवाई होत असल्याने व नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन तीन दिवसांनंतर अक्कलकुवा शहरातील सर्व व्यवहार मंगळवारपासून सुरळीत झाले आहेत. अक्कलकुवा पोलिस व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने दगडफेक व तोडफोडीच्या घटनेतील महत्वाच्या एका मुख्य संशयित आरोपीला गुजरातमधून ताब्यात घेतले आहे. त्याच्यासह ३० संशयितांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.

बातम्या आणखी आहेत...