आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय अधिसूचना:अक्कलकुवा पं.स. सभापती निवडीसाठी 13 रोजी विशेष सभा

अक्कलकुवा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभागाच्या, शासकीय अधिसूचने अन्वये अक्कलकुवा पंचायत समितीच्या सभापती व उप सभापती पदाच्या निवडीसाठी दि. १३ ऑक्टोबर रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.अक्कलकुवा पंचायत समितीच्या सभापती पदाच्या आरक्षणाचे वाटप उर्वरित कालावधीसाठी विनिर्दिष्ट केले आहे. त्यानुसार पंचायत समितीच्या उर्वरित कालावधीसाठी अक्कलकुवा पंचायत समितीचे सभापती व उपसभापती पदाच्या निवडीकरिता विशेष सभेचे आयोजन पंचायत समितीच्या दिगंबरराव पाडवी सभागृहात १३ ऑक्टोबर रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या विशेष सभेकरीता तहसिलदार यांना पीठासीन अधिकारी व अक्कलकुवा पंचायत समितीचे गट विकास अधिकाऱ्यांना सहायक पीठासीन अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...