आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्ला:बिबट्याचा भरदिवसा हल्ला; तरुण जखमी

तळोदा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील झिरी पाठडी शिवारात शेती कामे करणाऱ्या युवकावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. या अपघातात युवक गंभीर जखमी झाला असून पुढील उपचारासाठी त्याला तातडीने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. ही घटना बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.

झिरी पाठडी येथील रहिवासी युवक हेमंत सना पाडवी (वय ३५) हा कोटा दिवल्या पाडवी यांच्या शेतात काम करत होता. त्यावेळी अचानक त्याच्यावर बिबट्याने हल्ला चढवला. बिबट्याने हेमंतच्या पाठीवर पंज्याने वार केले. तसेच त्याच्या हातापायांनाही मुका मार लागला आहे. या वेळी बिबट्यासोबत एक पिल्लूही असल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ला होताच हेमंतने आरडाओरड केली. त्याच आवाज ऐकून शेजारच्या शेतात काम करणाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व बिबट्याला हुसकावून लावले.

जखमी झालेल्या हेमंतला तातडीने तळोदा उपजिल्हा रुग्णालयात आणले. बिबट्याने पंजा मारल्याने हेमंतच्या पाठीवर खोलवर जखम झाल्याने रक्तस्त्राव सुरू होता. त्यास तातडीने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवले. हल्लेखोर प्राणी हा बिबट्या नसून पट्टेदार वाघ असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. वनक्षेत्रपाल नीलेश रोडे यांनी पथकासह घटनास्थळाची पाहणी केली.

बातम्या आणखी आहेत...