आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी:लॉकअप तोडून फरार तिन्ही आरोपी मोकाटच; तीन पोलिसही निलंबित

नवापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉकअप तोडून फरार ५ पैकी २ आरोपींना अटक करण्यात आली असून, ३ आरोपी अद्याप मोकाटच आहेत. याप्रकरणी तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. कुख्यात दरोडेखोर व चंदन तस्करांना नवापूर पोलिसांनी ५ डिसेंबर रोजी मध्यरात्री अटक केली होती. त्यांना लॉकअपमध्ये जेरबंद करण्यात आले होते. अवघ्या आठ तासांत ते लॉकअप तोडून फरार झाले.

त्यातील एक आरोपीस गुजरात एलसीबीने तर दुसऱ्या आरोपीस नंदुरबार एलसीबीने मध्य प्रदेश राज्यातून अटक केली; परंतु तीन आरोपी १५ दिवस उलटले तरी अद्याप मोकाटच आहे. या संदर्भात नंदुरबार पोलिस फरार आरोपींचा शोध घेत असून, या संदर्भात नवापूर पोलिस ठाण्यातील कर्तव्यात कसूर केलेल्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन हिरे यांनी दिली आहे.

यांच्यावर झाली कारवाई
नवापूर पोलिस ठाण्यातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. यात पोलिस हवालदार राजेंद्र दोधू वाघ, पोलिस शिपाई उमेश रमाजीराव शितोळे, सहायक उपनिरीक्षक संजय भीमराव मराठे यांच्या समावेश आहे. तर खात्यांतर्गत या तिघांची चौकशी सुरू आहे.

खिडकी दुरुस्त, लँडलाइन फोन बंदच
नवापूर पोलिस ठाण्यातील पुरुष लॉकपची खिडकीत तोडल्यानंतर तिची दुरुस्ती करण्यात आली आहे. त्या ठिकाणी मोठे जाड लोखंडी रॉड बसवण्यात आले आहे. तर नवापूर पोलिस ठाण्यातील लँडलाइन क्रमांक ०२५६९ २५०३३३ असूनही बंदच आहे.

बातम्या आणखी आहेत...