आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:म्हसावद विकासो चेअरमनपदी अनिल पाटील यांची निवड; व्हाइस चेअरमनपदी भटू धनगर यांची निवड

शहादा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

म्हसावद येथील विविध कार्यकारी सोसायटी चेअरमनपदी अनिल पाटील व व्हाइस चेअरमनपदी भटू धनगर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सत्ताधारी गटाचे आठ व माजी जिल्हा परिषद सभापती डॉ. भगवान पाटील यांचे गटाचे चार संचालक असे एकूण बारा संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली. कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता सत्ताधारी गट व विरोधी गट यांची सामूहिक बैठक होऊन निर्णय घेण्यात आला. तालुक्यात म्हसावद विविध कार्यकारी सहकारी सोसायटी सर्वात मोठी असून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही सोसायटी अत्यंत महत्त्वाची आहे. बिनविरोध निवड झालेल्या संचालकांमध्ये शशिकांत पाटील, शरद चौधरी, प्रकाश चौधरी, दिलीप धनगर, ईश्वर पाटील, रमाकांत चौधरी, शोभा पाटील, प्रतिभा पाटील, वासुदेव पाटील, योगेश पाटील यांचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक घनश्याम बागल यांनी काम पाहिले.नवनिर्वाचित संचालकांचे दीपक पाटील, मकरंद पाटील, कृषी उत्पन्न सुनील पाटील, डॉ. भगवान पाटील यांनी स्वागत केले.

बातम्या आणखी आहेत...