आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वत्र कौतुक:अनिल वसावे करणार माऊंट एव्हरेस्टवर चढाई; 7 एप्रिल ते 7 जून 2023 दरम्यान चढाई मोहीम

अक्कलकुवा4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालाघाट येथील रहिवासी, सातपुड्याचे सुपूत्र अनिल वसावे आता माऊंट एव्हरेस्टवर चढाई करणार आहेत. या मोहिमेसाठी त्यांची निवड झाली आहे. त्यामुळे त्याने सातपुड्याचा लौकीकात भर घातली आहे. त्याच्या निवडीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे याच्या मार्गदर्शनाखाली ते ७ एप्रिल ते ७ जून २०२३ दरम्यान चढाई करणार आहेत. अनिल वसाने यांनी आतापर्यंत अफ्रिका खंडांतील उंच शिखर किलोमांजरी व व युरोप खंडातील उंच शिखर माऊंट एलबर्स व माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केले आहे. अशी कामगिरी करणारे ते पहिले आदिवासी तरुण आहेत. आता एव्हरेस्ट सर करुन एक नवीन कामगिरी करून तो सातपुड्याचा लौकीक वाढवणार आहे. आतापर्यंत आदिवासी विकास विभागामार्फत मदत करण्यात आली असून आता त्याला ३५ लाख एवढी मोठी रक्कम माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी लागवणार आहे. त्यासाठी विविध कंपन्या आणि संस्थांकडे त्यांनी मदत मागितली आहे.

बातम्या आणखी आहेत...