आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष ‎:अनिल वसावे आता माउंट एव्हरेस्ट गाठणार‎

धडगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वात उंच शिखर माउंट‎ एव्हरेस्ट सर करण्यासाठी अनिल‎ वसावे याची निवड झाली आहे.‎ मूळजी जेठा शारीरिक शिक्षण‎ महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेला‎ अनिल वसावे हा माउंट एव्हरेस्ट‎ मोहिमेत सहभागी होणार या‎ मोहिमेला ७ एप्रिल रोजी सुरुवात‎ होणार आहे. ही मोहीम ७ जूनपर्यंत‎ चालणार आहे.‎ अनिल वसावे याने आतापर्यंत‎ आफ्रिका खंडातील सर्वात उंच‎ शिखर किलिमांजारो आणि युरोप‎ खंडातील सर्वात उंच शिखर माउंट‎ एलब्रुस या शिखरावरील मोहीम‎ फत्ते केलेल्या आहेत. तसेच त्याने‎ माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम‎ देखील यशस्वीपणे फत्ते केली आहे.

‎अशी कामगिरी करणारा अनिल‎ वसावे ही पहिला आदिवासी युवक‎ आहे. तसेच अनिलने उत्तराखंड‎ येथे आयोजित करण्यात आलेल्या‎ सतोपंथ मोहीम यशस्वी केली.‎ आता तो एव्हरेस्टवीर होण्यासाठी‎ प्रयत्न करत आहे. त्याने अनेक‎ विश्व विक्रम आपल्या नावे केलेले‎ आहेत. अजून एक नवीन कामगिरी‎ करून तो आपल्या देशाचे नाव‎ जगातील सर्वात उंच शिखर सर‎ करून एक अभिमानाची कामगिरी‎ करणार आहे. जिल्ह्याचे आणि‎ देशाचे नाव उंचावण्यासाठी ही‎ मोहीम फत्ते करूच असा विश्वास‎ अनिल यांनी व्यक्त केला आहे.‎

एव्हरेस्ट सर‎ करण्याचे‎ स्वप्न‎
एव्हरेस्ट सर करण्याचे माझे स्वप्न आहे. हा विक्रम करणारा मी आदिवासी‎ समाजातील प्रथम ठरणार असल्याने माझा समाज व जिल्ह्माचे नाव तसेच राज्य‎ आणि देशाचे नावही उंचावण्यासाठी माझी धडपड आहे. ही मदत मला कुणी‎ उधारीने दिली तरी स्वप्न साकारल्यानंतर ती मी कुठलेही काम करून फेडेन.-‎ अनिल वसावे, आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक ,बालाघाट, ता.अक्कलकुवा‎

आर्थिक मदतीचे आवाहन‎
अनिल वसावेला आदिवासी विकास‎ विभागामार्फत मदत करण्यात आली आहे. मात्र,‎ त्याला ३५ लाख रुपये एवढी मोठी रक्कम माउंट‎ एव्हरेस्ट मोहिमेसाठी लागणार आहे. विविध‎ कंपनी आणि संस्था यांच्याकडून तो मदतीसाठी‎ प्रयत्न करत आहे. अनिलच्या या एव्हरेस्ट‎ मोहिमेसाठी दानशूरांनी आर्थिक मदत करावी‎ असे आवाहन करण्यात येत आहे. अनिलने ही‎ एव्हरेस्ट मोहीम फत्ते केली तर तो खान्देशचा‎ पहिला एव्हरेस्टवीर ठरणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...