आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकल्प‎:अमली पदार्थविराेधी अभियानास प्रारंभ‎

नंदुरबार‎19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस‎ महानिरीक्षक डॉ.बी.जी. शेखर पाटील‎ यांनी केलेल्या आवाहनास २४ तासांच्या‎ आत प्रतिसाद देत जिल्ह्याचे पोलिस‎ अधीक्षक पी.आर. पाटील यांनी‎ जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी‎ अभियान सुरू करून विद्यार्थ्यांकडून‎ अंमली पदार्थाच्या आहारी जाणार‎ नाही, कुणाला जावू देणार नाही, अशी‎ शपथ वदवून घेतली.‎ छत्रपती शिवाजी महाराज‎ नाट्यमंदिरात जिल्हा पोलिस दलाच्या‎ वतीने अंमली पदार्थ विरोधी‎ अभियानाला सुरुवात झाली. नाशिक‎ परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक‎ डॉ.बी.जी. शेखर पाटील यांच्या हस्ते‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अंमली पदार्थ विरोधी अभियानाचे‎ उद्घाटन झाले. पोलिस अधीक्षक‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पाटील यांनी उपस्थितांना अंमली पदार्थ‎ विरोधी संकल्पनेची शपथ दिली.‎

अभियानात या शाळा झाल्या सहभागी : अंमली पदार्थ विरोधी‎ अभियानाच्या या कार्यक्रमाप्रसंगी शहरातील पोदार इंटरनॅशनल स्कूल, जी.टी.पी‎ महाविद्यालय, श्रॉफ हायस्कूल, एस.ए. मिशन हायस्कूल, भामरे क्लासेस, अभिनव‎ विद्यालय, पी.जी. पब्लिक स्कूल या शाळा व महाविद्यालयांचे सुमारे १ हजार‎ विद्यार्थी तसेच मुख्याध्यापक, प्राचार्य व शिक्षक माेठ्या संख्येने उपस्थित होते. ‎

बातम्या आणखी आहेत...