आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:शासकीय मुलींच्या वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

नंदुरबार5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत गृहपाल मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, होळतर्फे हवेली, नंदुरबार येथे अनुसूचित जातीच्या विद्यार्थीनीसाठी वसतीगृह प्रवेशासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ज्या विद्यार्थींनीनी अद्याप वसतिगृह प्रवेश घेतला नसेल अशा विद्यार्थिंनीनी प्रवेशासाठी अर्ज सादर करावे, असे आवाहन गृहपाल सुषमा मोरे यांनी केले आहे.

वसतिगृहात प्रवेश गुणवत्तेनुसार देण्यात येत असून प्रवेशित मुलींना मोफत निवास, भोजन, नाश्ता, स्टेशनरी भत्ता, गणवेश भत्ता, सहल खर्च, तसेच दरमहा ६०० रुपये निर्वाह भत्ता देण्यात येईल.प्रवेश अर्ज मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, होळ तर्फे हवेली, नंदुरबार येथे मोफत उपलब्ध असून अधिक माहितीसाठी (९५२७५०५८९५) वर संपर्क साधावा, असे आवाहन विद्यार्थिनींना करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...