आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्यता घोषित:आयआयएच्या नंदुरबार उपकेंद्राला मान्यता

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स महाराष्ट्र चॅप्टर आणि केंद्रीय समितीकडून येथील उपकेंद्रास नुकतीच अधिकृत मान्यता घोषित झाली आहे.नंदुरबार उपकेंद्र हे नंदुरबार जिल्हा तसेच शिरपूर व दोंडाईचा येथील सदस्य मिळून स्थापित झाले असून आयआयएच्या राज्य व राष्ट्रीय समित्यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यरत असणार आहे.

नंदुरबार उपकेंद्राची पहिली सार्वजनिक सभा मंगळवारी येथे घेण्यात आली. या सभेमध्ये विविध विषयांची मांडणी तसेच काही महत्त्वाचे ठराव आणि उपकेंद्राच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. येथील उपकेंद्राचे चेअरमन म्हणून शिरपूर येथील आर्किटेक्ट योगेंद्र गुजराथी यांची एकमताने निवड करण्यात आली.

याशिवाय उपाध्यक्षपदी नरेंद्र जाधव, सचिव पदी नीरज देशपांडे, सहसचिव पदी दिनेश वाडीले, कोषाध्यक्षपदी धनंजय जोशी यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र चॅप्टरचे कार्यकारिणी सदस्य सॅम्युअल लवणे हे राज्याचेे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. येथील उपकेंद्राच्या कार्यकारिणी सदस्य पदी आर्किटेक्ट कैलास जैन, मेघना शहा, नयन वाडीले, प्रशांत पटेल, जयश्री सोमवंशी, विवेक श्रॉफ व हिरेन चलियावाला यांची निवड झाली.

बातम्या आणखी आहेत...