आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी केला दंगलीचा गुन्हा दाखल:तळोद्यात विसर्जन मिरवणुकीत हाणामारी दोन गटात वाद; ३ जण जखमी

तळोदा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून दोन गटात वाद उफाळून झालेल्या हाणामारीत ३ जण जखमी झाले असून, त्यापैकी एकावर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. याप्रकरणी दंगलीचा गुन्हे दाखल करण्यात आला आहे.गौरी विसर्जनानिमित्त सोमवारी विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या. दरम्यान शहरातील सोनार गल्लीतील मातोश्री ज्वेलर्स समोर सार्वजनिक जागी रात्री ११ वाजेच्या सुमारास मिरवणुकीत युवक नाचत असताना वाद होऊन हाणामारी झाल्याने दोन गटांची एकमेकांवर दगडफेक झाली.

यात प्रतीक मोहन मगरे, नीलेश चव्हाण व एका महिलेस किरकोळ दुखापत झाली आहे. तर योगेश उदल पाटील यांस धारदार शस्त्राने कमरेच्या खाली पार्श्वभागावर हल्ला केल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. पो.ना अजय ब्रिजलाल कोळी यांचा फिर्यादीवरून अक्षय दीपक माळी, लकेश मोहन माळी, नितीन वाघ, भय्या संजय माळी, प्रतीक मोहन मगरे, नीलेश चव्हाण, आशितोष पटेल, गोलू दातिर, चंद्रकांत गुरव, योगेश गुरव, योगेश पाटील यांच्यासह अन्य ५ ते ७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहायक निरीक्षक अमित कुमार बागुल तपास करत आहेत.उपविभागीय अधिकारी संभाजी सावंत यांनी रात्रीच घटनास्थळी येऊन धाव घेतली. अतिरिक्त सुरक्षा दल या ठिकाणी मागवण्यात आले होते. पोलिसांनी रात्रीच तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

तत्काळ शांतता समितीची बैठक घेऊन केले आवाहन
दंगलीच्या पार्श्वभूमीवर आमदार राजेश पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली शांतता किमेटीची बैठक झाली. नगराध्यक्ष अजय परदेशी, पो.उपविभागीय अधिकारी संभाजी सावंत, तहसीलदार गिरीश वखारे, सहायक पो.उ.नि. अमितकुमार बागुल आदी उपस्थित होते. प्रस्तावना पो.नि.पंडित सोनवणे यांनी केली. यावेळी उपस्थितांना शांततेचे आवाहन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...