आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:कोम्बिंग ऑपरेशनमध्ये हद्दपारास केली अटक

नंदुरबार9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. यात हद्दपार केलेला व्यक्तीसह अजामीनपात्र वॉरंटच्या आरोपीस अटक करण्यात आली.

नवापूर पोलिस ठाणे हद्दीत हॉटेल गार्डन येथे ४ जण जुगार खेळताना मिळून आल्याने त्यांच्या ताब्यातून २० हजार २६० रुपये रोख हस्तगत केले. नंदुरबार जिल्ह्यात प्रलंबित असलेल्या नॉन बेलेबल वॉरंटपैकी नंदुरबार तालुका पोलिस ठाणेे ५ व अक्कलकुवा पोलिस ठाणे ४ असे ९ नॉनबेलेबल वॉरंटची बजावणी केली. तसेच ५८ हिस्ट्रीशिटर्स तपासण्यात आले आहे. नंदुरबार जिल्हा हद्दीतून १ वर्षासाठी हद्दपार केलेला महेंद्र धरम ठाकरे (वय ३४ रा. डामरखेडा ता. शहादा) हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांची अथवा न्यायालयाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता शहादा येथे मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

५५२ वाहन चालकांची तपासणी; ५९ गुन्हे दाखल
पोलिसांनी १८ जून रोजी रात्री ८ ते ११वाजे दरम्यान दारू पिऊन बाहन चालवणाऱ्यांविरुद्ध मोहीम राबवून २० ठिकाणी नाकाबंदी केली होती. यात ५५२ चारचाकी व दुचाकीचालकांची तपासणी केली. त्यात ५९ वाहन चालकांनी मद्यप्राशन केल्याचे आढळून आले. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...