आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:वल्लभाचार्य व्रजराजकुमार महाराजांचे नंदुरबारात आगमन; भाविकांकडून पुष्पवृष्टी करीत जयघोष

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वल्लभ कुलभूषण वैष्णवाचार्य प.पू १०८ व्रजराजकुमारजी महाराज यांचे मंगळवारी दुपारी नंदनगरीत ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत आगमन झाले. या वेळी भाविक भक्तांनी श्रीनाथजींच्या जय घोष करीत पुष्पवृष्टी केली.

बृहत गुजराती पुष्टीमार्गीय वैष्णव वणीक समाजातर्फे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प.पू व्रजराजकुमार महाराज यांचे मंगळवारी दुपारी ३ वाजता शहरातील मोठा मारुती मंदिर परिसरात आगमन झाले. सायंकाळी बाबूभाई चक्कीवाला गुळवाडीत प.पू. व्रजकुमार महाराज यांनी समाजाच्या पदाधिकाऱ्यांशी हितगूज व मार्गदर्शन केले. शहरात प.पू. व्रजकुमार महाराज यांच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक उपक्रम सुरू आहेत.

त्यात वैष्णव समाज कसा अंतर्मुख होईल, याची रूपरेषा यावेळी ठरवण्यात आली. बुधवारी सकाळी ९ ते १० वाजे दरम्यान देसाईपुरा परिसरातील पुष्टीधाम येथे ब्रह्मसंबंध (गुरुमानने) कार्यक्रम होईल. त्यानंतर देसाईपुरा येथील पोरवाडवाडीत रात्री ८ ते १० दरम्यान जाहीर प्रवचन होईल. या वेळी समाजाध्यक्ष विनयभाई श्रॉफ, बकुलभाई शाह, हरेश पारेख, डॉ.नूतन शाह, भरत शाह, वीरेंद्र वाणी, रोहित शाह, लालाभाई वाणी, राजेंद्र वाणी, कौशिक शहा, राजेश शहा, रजनीकांत शाह, पीयूष शाह उपस्थित राहतील.

बातम्या आणखी आहेत...