आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनयभंगाचा गुन्हा दाखल:आश्रमशाळा अधीक्षिकेचा विनयभंग; शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर गुन्हा

शहादा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील आश्रमशाळेच्या अधीक्षिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी आदिवासी विकास प्रकल्पाचा शिक्षण विस्तार अधिकाऱ्याविरुद्ध शहादा पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहादा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांची वेरूळ, दौलताबाद येथे शैक्षणिक सहल काढली होती. यात चिरखान व शहाणा येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींसह शिक्षक व शिक्षिका, अधीक्षिका असे सहा एसटी बसेस मधून रवाना झाले होते.

दरम्यान पीडित अधीक्षिका व शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र जगन्नाथ मुसळे एकाच बसमधून प्रवास करीत असताना ३० सप्टेंबर रोजी परतीच्या प्रवासात रात्री १.३० ते ३.३० वाजेच्या सुमारास राजेंद्र मुसळे याने पीडित महिला अधीक्षिकेला शेजारी आसनावर बसून विनयभंग केला. याप्रकरणी ६ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास फिर्याद नोंदवली आहे. पोलिस निरीक्षक बाबासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जितेंद्र पाटील तपास करीत आहेत.

समिती गठीत करून चौकशी सुरू
या प्रकरणाची शनिवारी माहिती मिळाली असता तत्काळ स्त्री अधीक्षिकेला पोलिस प्रशासनाच्या दामिनी पथकाकडे पाठवले. शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र मुसळे यांची शहाद्याहून नवापूर तालुक्यात बदली केली. महिला तक्रार निवारण समिती गठीत करून चौकशी सुरू केली आहे.

त्याचा अहवाल लवकरच वरिष्ठ कार्यालयातील अप्पर आयुक्तांना पाठवण्यात येईल. त्यानुसार पुढील कारवाई होणार. सध्या त्यांना पंधरा दिवस सक्तीचा रजेवर पाठवण्यात आले आहे. मीनल करणवाल, प्रकल्पधिकारी, नंदुरबार

बातम्या आणखी आहेत...