आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेदम हाणामारी‎:वसतिगृहात मुलींमध्ये‎ मारहाण; एक जखमी‎

तळोदा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील आदिवासी विकास ‎विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात ‎मुलींमध्ये बेदम हाणामारी‎ झाल्याची घटना बुधवारी रात्री ८ ते‎ ९ वाजेच्या सुमारास घडली. यात‎ एक विद्यार्थिनी जखमी झाली‎ असून तिला तळोदा येथे उपजिल्हा ‎रुग्णालयात दाखल केले.‎ तळोदा शहरात आदिवासी‎ मुलींच्या वसतिगृहात प्रकल्प ‎ अधिकारी पाहणीसाठी आले होते.

याबाबत मारहाणीत जखमी‎ झालेल्या मुलीने आपल्या‎ पालकांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती ‎दिली. त्यावेळी तिने प्रकल्प ‎ अधिकाऱ्यांसोबत कोणीही महिला ‎ ‎कर्मचारी नसल्याचे तिच्या‎ वडिलांना सांगितले. यामुळे‎ मारहाण झालेल्या मुलगी व तिचे ‎वडील प्रकल्प अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस ‎अधीक्षक व पोलीस निरीक्षक ‎यांच्याकडे मुलीला घेऊन गेले‎ होते.

याबाबतीत अशाप्रकारे कृती ‎करू नको, यामुळे वसतिगृहाची ‎बदनामी होते असे वसतिगृहात‎ राहणाऱ्या एका मुलींच्या गटाने व‎ वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी‎ समजावण्याच्या प्रयत्न केला होता.‎ वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी‎ मुलींच्या या गटाला माझ्या मुलीला‎ ‎मारहाण करण्यासाठी दबाव‎ आणला असा मारहाण झालेल्या‎ मुलीच्या वडिलांनी आरोप केला‎ झालेल्या मुली सोबत मुलींच्या‎ एका गटाची या विषयावरून‎ बाचाबाची झाली.‎

मुलींचा व्यक्तिगत वाद‎
प्रकल्प अधिकारी कधीही‎ रात्रीचा सुमारास मुलींच्या‎ वसतिगृहात आलेले नाहीत.‎ याशिवाय ते दुपारी आले असता‎ त्यांनी मुलींच्या वसतिगृहातील‎ महिला गृहपाल व कर्मचाऱ्यांना‎ सोबत घेऊन वसतिगृहाची पाहणी‎ केली. मुलींचा वाद व्यक्तिगत‎ आहे. याबाबत अधिकारी व‎ कर्मचाऱ्यांना नाहक गोवण्याचा‎ प्रयत्न केला जात आहे.‎- अर्चना जाधव, गृहपाल वसतिगृह‎

मुलींना मारहाण‎ करण्यास भाग पाडले‎
प्रकल्प अधिकारी कधीही‎ विद्यार्थिनींच्या वसतिगृहात‎ शिरतात. याबाबत मुलीने‎ माझ्याकडे तक्रार केली. याबाबत‎ पोलीस ठाणे संपर्क साधला‎ असतात या बाबीचा राग येऊन‎ तेथील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींवर‎ दडपण टाकून मुलीला मारहाण‎ करण्यास भाग पाडले.‎- दयानंद चव्हाण, पालक‎

बातम्या आणखी आहेत...