आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहारातील डोंगरगाव रस्त्यावरील सुघोषाघंट मंदिरात धाडसी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी रात्री अंदाजित २ ते ३ वाजेच्या सुमारास झाली. या मंदिरात एकून ८ दान पेट्या होत्या. त्यातील मंदिराच्या वरच्या गाभाऱ्यातील सात दानपेट्या उचलून मंदिराच्या मागील वोट्यावर फोडल्या तर एक मुख्य दानपेटी जागीच फोडल्याचे निदर्शनास आले. दानपेट्यमध्ये अंदाजित अडीच लाखाच्या आसपास रक्कम असावी असा अंदाज व्यक्त होत आहे.
मध्यरात्री साधारणता एक ते तीन वाजेच्या दरम्यान दादावाडी परिसरात विद्युत पुरवठा खंडित होता. त्याच्या फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी दादावाडी जैन मंदिरात मागील बाजूस असलेल्या दरवाजाच्या कडी कोंडा तोडून प्रवेश केला. त्यानंतर वरच्या मजल्यावर मुख्य मंदिराच्या डाव्या बाजूच्या प्रवेशद्वाराचे कटरने कुलूप तसेच कडी कोंडा तोडून प्रवेश केला. अज्ञात चोरट्यांनी मंदिरात असलेल्या ७ दान पेट्या होत्या त्या तोडल्या. जैन मंदिराचे विश्वस्त डॉक्टर कांतीलाल टाटिया यांना माहिती दिली. डॉक्टर कांतीलाल टाटिया यांनी लागलीच मंदिराच्या घटनास्थळी पाहणी केली.
उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे प्रभारी पोलीस अधिकारी राजन मोरे यांनी लागलीच सकाळी साडेपाच वाजता पोलीस कर्मचाऱ्यांसह भेट देऊन पाहणी करून नंदुरबार येथून गुन्हा अन्वेषण विभागाचे अधिकारी, ठसे तज्ञ व श्वान मागविण्यात आले. श्वान सरळ दादावाडी परिसरातून डोंगरगाव चौफुली पर्यंत गेले बराच वेळ पर्यंत तिथेच घुटमळले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.