आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रेयवाद:धूळफेक करीत कामांचे श्रेय घेण्याचा खासदारांचा प्रयत्न, पत्रकार परिषदेत खासदार डॉ. हीना गावितांवर आमदार राजेश पाडवी यांचा आरो

तळोदा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कागदपत्रे जाहीर करण्याची मागणी

माझ्या विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी मंत्री व नेत्यांना भेटून मी निधी मंजूर करून आणला असताना खासदार डॉ. हीना गावित श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप आमदार राजेश पाडवी यांनी सोमावल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

आमदार पाडवी म्हणाले की, नंदुरबार जिल्हा हा आदिवासीबहुल व आकांक्षित जिल्हा आहे. मुख्यतः ग्रामीण व दुर्गम-अतिदुर्गम भागातील आदिवासी समूहाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध योजना राबवत असतात. त्यापैकी दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची सीआरआयएफ योजना राबवली जाते. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात ग्रामीण भागाला शहराच्या मुख्य प्रवाहाला जोडण्यासाठी मी २० ऑक्टोबर २०२० रोजी मतदारसंघातील शहादा व तळोदा तालुक्यासाठी मागणी पत्र महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई येथे सादर केले. माझ्या पत्राच्या विनंतीनुसार केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी शहादा तालुक्याकरिता ४३९.३९ लाख रुपये व तळोदा तालुक्याकरिता ५०४.३३ लाख रुपयांच्या निधीला २० एप्रिल २०२१ रोजी मंजुरी देऊन सार्वजनिक बांधकाम विभाग, नंदुरबार यांच्याकडे निधी वर्ग केला. तळोदा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ७५३ बी ते सोमावल, नर्मदानगर एम.डी.आर-१ रोड एम. डी.आर ४४ पर्यंतचा असा एकूण ६ कि.मी.चा रस्ता मंजूर करण्यात आला. सा.बां.विभाग नंदुरबार यांनी तांत्रिक मान्यता देऊन एक कोटीपेक्षा जास्त किंमत असल्याने अधीक्षक अभियंता सा.बां. विभाग धुळे यांनी त्याची निविदा प्रक्रिया राबवली. हे काम आम्ही आणलेले आहे, अशी बतावणी करून काही लोकप्रतिनिधी सर्वसामान्य आदिवासी बांधवांच्या डोळ्यात धूळफेक करीत आहे. व सा.बां. विभागाच्या अधिकारी वर्गावर दबाव आणून उद‌्घाटन व भूमिपूजनासाठी घाट घालण्याचे प्रयत्न करीत आहेत, असा आरोप त्यांनी खासदार डॉ. हीना गावित यांच्यावर अप्रत्यक्षपणे केला. कामाचे श्रेय घेण्याचे प्रयत्न करीत आहे. त्यांनी पाठपुराव्याचे दस्तएेवज व कागदपत्रे जाहीर करावेत, असे आव्हानही दिले. आमदार राजेश पाडवी यांनी या कामाऱ्या पाठपुराव्यासाठी केलेला पत्रव्यवहार व निवेदनाच्या प्रती सादर करत संबंधित घटनेचा इतिवृत्त पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना कळवणार असल्याचे सांगितले.

पत्रकार परिषदेला सभापती यशवंत ठाकरे, माजी सभापती सतीश वळवी, पं.स. सदस्य विजय राणा, पं.स. सदस्य विक्रम पाडवी, पं.स. सदस्य दाज्या पावरा, वीरसिंग पाडवी, गोपी पावरा, बळीराम पाडवी,भरत पवार, अनिल पवार, प्रकाश वळवी, सानूताई पाडवी, किरण सूर्यवंशी उपस्थित होते.

पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त मागवला
दरम्यान, आमदार व खासदार यांच्यात रंगलेल्या विकासकामांच्या वादामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासनदेखील सतर्क झाले आहेत. दरम्यान, दुसरीकडे खासदार डॉ. हीना गावित या रस्त्याचे भूमिपूजन करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे समजल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात राहावी म्हणून दंगा नियंत्रण पथकालादेखील पाचारण केले होते.

खासदारांच्या आधी आमदारांचे भूमिपूजन
तळोदा | सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार यांनी तांत्रिक मान्यता देऊन निविदा प्रक्रिया पूर्ण करून आमदार आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते राज्य महामार्गापासून सोमावल ते नर्मदानगरपर्यंत रस्त्याचे खासदार डॉ. हीना गावितांच्या आधीच भूमिपूजन केले. या वेळी उपअभियंता नितीन वसावे, जि.प. सदस्य प्रकाश वळवी, भरत पवार, पं.स. सदस्य विजय राणा, दाज्या पावरा, महेंद्र पाडवी, विक्रम पाडवी, भाजप महिला जिल्हा उपाध्यक्ष शानूभाई वळवी, माजी सभापती सतीश वळवी, माजी तालुकाध्यक्ष बळीराम पाडवी, नारायण ठाकरे, दरबार सिंह, दारासिंग वसावे, सुरेश पाडवी, चेतन गोसावी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...