आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:नागपूरच्या अधिवेशनास उपस्थित रहा ; श्रीखंडे

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्ष भटके विमुक्त आघाडीचे राज्यव्यापी अधिवेशन २२ डिसेंबर रोजी नागपूर येथे होत असून त्यात भटके विमुक्तांच्या विविध प्रश्नांवर विचार मंथन होणार आहे. युती शासनासह केंद्र शासनाच्या धोरणांची व विविध योजनांची माहिती मिळणार आहे. त्यामुळे या राज्यव्यापी अधिवेशनास नंदुरबार जिल्ह्यातील जास्तीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष विशाल श्रीखंडे यांनी केले.

या अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, केंद्रीय राज्य मंत्री डॉ. भागवत कराड, प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, मंत्री अतुल सावे, डॉ.विकास महात्मे, खासदार प्रीतम मुंडे, आमदार श्रीकांत भारतीय, भिकुजी दादा विधाते, विश्वास पाठक, अतुल वझे, रामेश्वर नाईक उपस्थित राहून मार्गदर्शन करतील.

पक्षाचे काम भटक्या विमुक्त समाजात वाढावे यासाठी हे राज्यव्यापी अधिवेशन आयोजित केले आहे. त्यास संपूर्ण राज्यातून महिला, युवक, युवती मोठ्या संख्येने प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहतील. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीखंडे यांनी केले आहे.

मान्यवरांचे मार्गदर्शन हाेणार
या अधिवेशनाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून भटके विमुक्तांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा हाेऊन मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे अडचणीतून मार्ग निघू शकेल. तसेच विकासाचा मार्ग माेकळा हाेईल, अशी अपेक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...