आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील नायब तहसिलदार, तहसिलदार व उपजिल्हाधिकारी यांच्या शासनस्तरावर प्रलंबित सेवा विषयक बाबी तात्काळ निकाली काढण्यात याव्यात यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी तहसिलदार, नायबतहसिलदारांनी काळया फिती लावून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यांवर बसून शुक्रवारी आंदोलन केले.
नायब तहसिलदार संवर्गाची सेवा ज्येष्ठता यादी प्रसिध्द करा, तहसिलदार संवर्गाची सन २०११ पासूनची सेवा ज्येष्ठता यादी प्रसिध्द करा, नायब तहसिलदार संवर्गातून तहसलिदार संवर्गात पदोन्नती करा, तहसिलदार संवर्गातून उपजिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती करण्यात यावी, नायब तहसिलदार व तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची कालबध्द पदोन्नती बाबतचे प्रलंबीत प्रस्ताव तात्काळ निकाली काढण्यात यावेत. परिविक्षाधीन नायब तहसिलदार व तहसिलदार यांचे परिविक्षाधीन कालावधी समाप्ती बाबतचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढावेत, यासह विविध नायब तहसिलदार व तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्याचे स्थायित्व प्रमाणपत्राबाबतचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढावेत, आदी मागण्या करून आंदोलन करण्यात आले.
उपजिल्हाधिकारी महेश शेलार, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, नवापूरचे तहसिलदार मंदार कुलकर्णी, तळोद्याचे तहसिलदार गिरीश वखारे, अकुव्याचे सचिन मस्के, अक्राणीचे तहसिलदार ज्ञानेश्वर सपकाळे, नायब तहसीलदार भिमराव बोरसे, राजेश अमृतकर, रमेश वळवी, रिनेश गावित, रामजी राठोड, चौधरी, शैलेश गवते, शेखर मोरे, सोनवणे आदी सहभागी झाले होते. आंदोलन करताना अधिकारी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.