आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य सुविधा कधी?:शहादा ग्रामीण रुग्णालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; 70 खाटांचे रुग्णालय; साडेचारशे कोटी रुपये खर्चून रुग्णालयाची निर्मिती

शहादा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील ग्रामीण रुग्णालयाचे काम पूर्ण झाले असून, उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. गेल्या चाळीस वर्षांनंतर शहरासह तालुक्यातील नागरिकांचे स्वप्न पूर्तीला येणार आहे. आता लोकार्पण सोहळ्याकडे लक्ष लागले आहे.

सुरुवातीपासून नगरपालिका रुग्णालय होते. रुग्णालयात पाहिजे तशा सुविधा नव्हत्या. शहरातील लोकसंख्या बघता रुग्णालय कमी पडत होते. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची संख्या कमी होती. कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी मिळत नव्हते. दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे असताना एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर रुग्णालय सुरू होते.आहे त्या परिस्थितीत आरोग्य कर्मचाऱ्यांनी चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला.

प्रत्येक नगराध्यक्षांनी आपआपल्या कार्यकाळात नगरपालिका रुग्णालयाला ग्रामीण रुग्णालयात दर्जा द्यावा म्हणून पाठपुरावा केला होता. तत्कालीन आमदार, खासदार, पालकमंत्र्यांनी देखील आश्वासने दिली होती. शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अरुण चौधरी यांनीदेखील सातत्याने पाठपुरावा केला होता. शेवटी नगरपालिका रुग्णालयाला ग्रामीण रुग्णालयाच्या दर्जा मिळाला.जागेचा प्रश्न होता तोही कालांतराने मिटला. शहादा शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर नवीन तहसील कार्यालयासमोर पाच एकर जागेत ग्रामीण रुग्णालयाची भव्य इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन आता उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

बातम्या आणखी आहेत...