आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:तळोदा महाविद्यालयाला करिअर कट्टाचे 2 राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

तळोदाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला करिअर कट्टाचे दोन राज्यस्तरीय पुरस्कार राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत नाशिक येथे प्रदान करण्यात आले.

राज्य माहिती तंत्रज्ञान व सहाय्यता केंद्र यांच्या विद्यमाने महाविद्यालयीन युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘करिअर कट्टा’ उपक्रम राबवण्यात येतो. २०२१-२२ या वर्षात येथील महाविद्यालयातर्फे या उपक्रमाचे आयोजन वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात आले होते. त्या आधारावर राज्यस्तरीय महाविद्यालय स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात महाविद्यालयास राज्यस्तरीय उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. ते प्राचार्य डॉ.एस.आर. मगरे यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, करिअर कट्टाचे राज्य समन्वयक यशवंत शितोळे व विभागीय समन्वयक डॉ.सचिन नांद्रे यांच्या उपस्थितीत स्वीकारले. तर दुसरे पारितोषिक उकृष्ट राज्यस्तरीय जिल्हा समन्वयक म्हणून डॉ.जी.एम. मोरे यांना मिळाले. त्यामुळे महाविद्यालयाच्या नावलाैकिकात भर पडली. याबद्दल संस्थाध्यक्ष भरत माळी, सुधीरकुमार माळी, रमण चौधरी यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...