आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:जागतिक एड्स दिनानिमित्त जागृती रॅली

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक एड्स दिनानिमित्त शहरातून रॅली काढून जनजागृती करण्यात आली. यात जिल्हयातील सर्व महाविद्यालयीन युवक व युवतींनी सहभाग नोंदवला.सर्वप्रथम मैदानात उपस्थित युवकांना जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. नितीन मंडलिक यानी जिल्ह्यातील एड्स स्थिती काय आहे या विषयी मार्गदर्शन केले. तसेच जागतिक एड्स दिनाचे घोषवाक्य “आपली एकता आपली समानता एचआयव्हीसह जगणाऱ्या करीता” यासंबंधी माहिती देण्यात आली.

त्याचप्रमाणे जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधुन जिल्हयात विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. यात पोस्टर स्पर्धाबाबत माहिती दिली. जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी रॅलीचा प्रारंभ केला. समारोप्रसंगी वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रितम पाडवी, डॉ. राजेश केसवाणी, विश्वास सूर्यवंशी नवनिर्माण संस्थेच अध्यक्ष रवी गोसावी, सोमनाथ वायफळकर, नरेंद्र सुलक्षणे, तेजल माळी, गणेश कासार, राहुल गोल्हाईत, मोग्या वळवी, गणेश कासार, हरपाल जाधव, किरण देवरे, जितेंद्र सूर्यवंशी, महेश गवले आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...