आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिकित्सा शिबिर:आयुर्वेदिक उपचार लाभदायक : गावित

नंदुरबार3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुर्वेदिकमधील उपचार पध्दती चांगल्या प्रकारे लाभदायक ठरतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारमध्ये आयुर्वेदाच्या आयुष मंत्रालयाची स्थापना केली. आयुर्वेदिकमधील उपचार हे आजही दुर्मिळ आणि लाभदायक आहेत. आजच्या परिस्थितीत जंगलांचा ऱ्हास होऊ लागल्याने दुर्मिळ आयुर्वेदिक औषधी नागरिकांना उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या आयुर्वेदिक चिकित्सा शिबिराचा नागरीकांनी लाभ घ्यावा, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित यांनी केले.

नंदुरबार येथील पारेश्वर मेडिकलच्या शुभारंभानिमित्त गुरुजी आयुर्वेद नाशिक यांच्या वतीने प.पु.पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मोफत आयुर्वेदिक आरोग्य चिकित्सा व उपचार शिबिराचा शुभारंभ झाला. यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित बोलत होते. खासदार डॉ. हिना गावित, भागवताचार्य पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...