आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वार्षिक मेला‎:बाबा गरीबदास वार्षिक उत्सवात कार्यक्रमांची रेलचेल‎

नंदुरबार‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील सिंधी कॉलनीत बाबा‎ गरीबदास मंदिरात सद्गुरु महाराज‎ बाबा गरीबदास यांचा वार्षिक मेला‎ उत्सव विविध कार्यक्रमांनी‎ उत्साहात पार पडला. या‎ उत्सवातील कार्यक्रमांना सिंधी‎ समाजातील महापुरुषांसह‎ राजकीय, सामाजिक अशा‎ विविध क्षेत्रांतील मान्यवरांची‎ उपस्थिती लाभली. इंदूरचे‎ खासदार शंकर लालवानी यांची‎ शहरातून स्वागत रॅली काढण्यात‎ आली. या उत्सवाला समाजबांधव‎ माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.‎ येथील पूज्य बाबा गरीबदास‎ सेवा मंडळ व पूज्य अपर सिंध‎ पंचायत यांच्या वतीने सद्गुरु‎ महाराज बाबा गरीबदास यांचा‎ वार्षिक मेला उत्सव घेण्यात‎ आला.

शहरातील सिंधी कॉलनीत‎ सलग तीन दिवस विविध‎ कार्यक्रमांचे आयोजन केले.‎ यावेळी समाजातील महापुरुष‎ पूज्य साई भरातलाल मसंद, साई‎ सुकदेवलाल राजकोट, रेणुका‎ माता, जेठानंद उदासी, गैताम‎ ठाकुर आदी महापुरुष उपस्थित‎ हाेते. या उत्सवाला इंदूरचे‎ खासदार शंकर लालवानी,‎ छत्तीसगड भाजपचे प्रदेश मीडिया‎ प्रमुख अमित चिमनानी यांची‎ विशेष उपस्थिती हाेती. शहरात‎ आगमन होताच खासदार‎ लालवानींचे भव्य स्वागत झाले.‎

बातम्या आणखी आहेत...