आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांनी घेतला निर्णय:योग्य भाव मिळेपर्यंत पपई तोडणीला बंदी

शहादा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांच्या पपई पिकाला व्यापारी आवश्यक तो भाव देत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता म्हणून दिनांक १५ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता फळबागायतदार संस्थेची व्यापक बैठक शहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत अभिजित पाटील यांनी बोलावली होती. बैठकीला शेतकरी उपस्थित होते. मात्र व्यापारी काही कारणास्तव उपस्थित न राहिल्याने दिनांक १६ डिसेंबर रोजी पुन्हा व्यापारी व शेतकऱ्यांची बैठक होणार आहे.

पुढील निर्णय व योग्य तो भाव मिळेपर्यंत शेतकऱ्यांनी पपईची तोड करू नये असे आवाहन अभिजित पाटील यांनी केले आहे.बैठकीला अभिजित पाटील, जयनगर तालुका शहादा येथील भगवान पाटील, मामाचे मोहिदा येथील जयप्रकाश रामदास पाटील, भाऊभाई पाटील, वरुळ कानडी येथील अशोक पाटील, वडाळी तालुका शहादा येथील दीपक पाटील उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...