आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:यंदा आपटी फटाक्यांवर बंदी, नियम पालन करा; जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली माहिती

नंदुरबार14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळी सणात यंदा आपटी फटाक्यांना बंदी घालण्यात आली असून, स्टॉलजवळ अग्निसुरक्षेची जबाबदारी टाकण्यात आली आहे. रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये, धार्मिक प्रार्थनास्थळे यांच्या सभोवतालचे १०० मीटर पर्यंतचे क्षेत्रात शांतता प्रभागात फटाक्यांचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तर तात्पुरत्या स्वरूपात फटाका विक्री व साठवणूक करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व परवानाधारकांनी मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.

फटाका विक्री करताना फटाक्यांसाठी शंभर किलो ग्राम व शोभेचे झकाकणारे चायनीज फटाक्यासाठी पाचशे किलोग्राम एवढा परिमाणापेक्षा जास्त परिमाण बाळगता येणार नाही. आपटून फुटणारे फटाक्यांना मान्यता नसल्याने अशा फटाक्यांच्या विक्रीस परवानगी असणार नाही. गाडीतून किंवा फिरत्या वाहनातून फटाके विक्री करता येणार नाही.

पर्यावरण सुरक्षा नियमानुसार एखादा फटाका उडवण्याच्या जागेपासून ४ मीटर अंतरापर्यंत १२५ डेसिबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांच्या उत्पादन, विक्री व वापर यावर बंदी घालण्यात आली आहे. तर साखळी फटाक्यांत ५०, ५० ते १०० व त्यावरील फटाके असतील तर आवाजाची मर्यादा फटाका उडवण्याच्या जागेपासून ४ मीटर अंतरापर्यंत अनुक्रमे ११५, ११०व १०५ डेसिबल एवढी असावी. रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत दारूकाम व फटाक्याचा वापर करता येणार नाही.

अशी घ्यावी लागेल विक्रेत्यांना काळजी
फटाके विक्रीची जागेची निवड करताना एक किंवा त्यापेक्षा अधिक समांतर रांगांमधील स्टॉलचे दरवाजे समोरासमोर नसावेत, ते मागील बाजूने बंद असावेत. फटाका विक्री स्टॉलजवळ अग्निसुरक्षा व्यवस्था, आणि पाण्याचे साठे (टँकर) ठेवणे आवश्यक असेल. स्टॅालमध्ये अग्नि उपद्रवास कारणीभूत ठरणाऱ्या वस्तू प्रतिबंधित असेल. फटाका विक्री परिसरात दक्षता पथकाची गस्ती असावी.

परवानगीसाठी अर्जाची २६ सप्टेंबरपर्यंत मुदत
फटाका विक्री व साठवणुकीसाठी परवानगी अर्ज १२ सप्टेंबर ते २६ सप्टेंबरपर्यंत‍ वितरित होतील. अर्ज सादर करण्याची मुदत २६ सप्टेंबरपर्यंत राहील. पोलिस विभागाने सादर अर्जावर अभिप्राय कळवण्याची अंतिम मुदत ५ ऑक्टोबर असेल तर शिफारशीअंती मंजूर परवाने वितरण १० ते १५ ऑक्टोबर या कालावधीत राहील.

बातम्या आणखी आहेत...