आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामकरसंक्रांती सणाच्या वेळी प्लास्टिक किंवा कृत्रिम वस्तूचा वापर करून बनवण्यात आलेल्या नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक व हाताळणीस प्रतिबंध केला असल्याचे आदेश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी काढले आहेत.नायलॉन मांजामुळे पक्षी व मानव जीवितास इजा होते.
काही प्रसंगी त्या इजा प्राणघातक ठरतात. मकरसंक्रांती सणाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर पतंग उडवण्याचा खेळ खेळला जातो. पतंगासह तुटलेले नायलॉन मांजाच्या धाग्यांचे तुकडे जमिनीवर पडतात नायलॉन मांजाचे तुकडे हे लवकर विघटन होण्याजोगे नसल्याने गटारी व नदी-नाल्यासारख्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण करतात.
तसेच नायलॉन मांजाचे तुकड्यामुळे गाय अथवा तत्सम प्राण्यांनी नायलॉन मांजाचे तुकडे समाविष्ट असलेले खाद्य सेवन केल्यामुळे त्यांना गुदमरण्याचा त्रास होतो. अशा धाग्यांमधील प्लास्टिकच्या वस्तुंमुळे विविध प्रकारचे दुष्परिणाम होतात. माती व पाण्याच्या गुणवत्तेची पातळी घसरते. प्लाटिक किंवा इतर कृत्रिम वस्तूपासून बनवलेल्या नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या पक्क्या धाग्याचा वापर पतंग उडवण्याचा सणाच्या वेळी करण्यात येतो. त्यामुळे पक्षी व मानवी जीवितास तीव्र इजा होण्याचा नायलॉन मांजाचे दुष्परिणाम लक्षात घेऊन त्याच्या वापरावर बंदी घातली आहे.
जनजागृतीही करावी
नायलॉन मांजाच्या धाग्याच्या दुष्परिणामांबाबत शाळा, महाविद्यालय तसेच लोकांमध्ये जनजागृती करावी. तसेच सर्व नागरिकांनी निर्देशाचे पालन करावे, असेही नमूद केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.