आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळफास:नापिकी ; कर्जास कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील आसाणे येथे एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना साेमवारी सकाळी घडली. समाधान हिरामण पाटील (वय ३९) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.बँकेकडून व इतर खासगी घेतलेले कर्ज दिवसेंदिवस वाढत असल्याने तसेच नापिकी यामुळे आलेल्या नैराश्यातून राहत्या घरीच शेतकरी पाटील यांनी गळफास घेतला.

पाटील यांची आसाणे शिवारात चार एकर शेती आहे. केलेला खर्चही निघेनासा झाला. कर्जाचा डोंगर वाढत गेल्याने पाटील यांना नैराश्य आले. त्यांनी घरातच गळफास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी व लहान मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...